Open letter to godess Padmavati

Open Letter To PADMAVATI दे वी पद्मावती, आदर पूर्ण नमन, खूप दिवसां पासून आमच्या देशात इतिहासा वरून वाद होत आलेत,आणि अजूनही सुरुच आहेत, आणि या वादात नेहमी महान युगपुरुषांचा अपमानच होत आला,आज त्या यादी मध्ये तुम्ही उभ्या आहात, खूप वाईट वाटत ,पण नेहमी प्रमाणे बोलण्या व्यतिरीक्त मी काहीच नाही करू शकत, राजपूत समाज तुम्हांला देवी मानतो, का नाही मानणार त्यागाची परिसीमा गाठलीत तुम्ही...पण खरे पाहता आमच्या देशात काहीच किंमत नाही हो या त्यागाची, कारण तुमचा अपमान होऊ नये म्हणारे पण त्यांचा वर्तनातून तुमचा अपमानच करताय आणि जे स्वतःचा स्वार्थासाठी तुमच्या नावाचा वापर करताय त्यांना आमच्या कायद्याचं आणि धर्मनिरपेक्षतेच संरक्षण मिळालाय, यात तुम्ही सांगा तुमच्या त्यागाचा मान कोण ठेवतय?? केवळ मनोरंजन म्हणुन मूवी बघा म्हणार्यांना तर दूर दूर पर्यंत तुमची आठवण पण नाही. खूप दिवसांपासून बातम्या बघतेय खूप मोठे प्रकांड पंडित येतात चर्चा करायला वाहिनीवर ...