Posts

Showing posts from June, 2020

नाव ...

Image
 Naav.. कधी कधी काही घटना मनाला इतक्या अस्वस्थ करतात कि आपण स्वतःच काही गोष्टींवर कथानक लिहू लागतो , अशीच हि एक गोष्ट जो माझा अनुभव नाही पण कुणा जवळच्या व्यक्तीच्या अनुभवा वरून कागदावर उतरवली .आयुष्य पण अथांग सागरावर डौलणाऱ्या नावे   सारखंच तर असतं , जीचा जन्मचमुळी सागरासाठी  झालायं , पण सागराची म्हणून नाही . अशी हि नाव जिला सतत आपल्या ध्येयाची जाणीव असायची , त्यासाठीच ती प्रवास करायची तिला एका वाऱ्याच्या झोक्याने अशी हलवली कि ती त्या सागराच्या सहवासा साठी तडपू लागली , क्षणिक सुखासाठी स्वतःला बुडवून घेऊ इच्छित होती ,अविचारी  बनली होती पर्वा नव्हती तिला बुडण्याची !   सागरच आपलं सर्वस्व तिला वाटत होता , हे   जरी खरं असलं कि सागरा शिवाय तिच्या  अस्तित्वाला किंमत नव्हती तरी ती फक्त सागरासाठीच थोडी बनली होती ? खरं तर तोच सागर तिचासाठी  न मिळणारी अशक्यप्राय गोष्ट होती ,तळमळत होती, विव्हळत होती . त्याला मिळवण्यासाठी ,पण नाही ते कधीच शक्य होणार नव्हतं ,कारण उसळणारा पाण्याचा प्रवाह आणि लाकडाची ती नाव एक होणे  अशक्य , ती कुठे हि गेली तरी वेगळी पडणार होती , पण वेडी होत