नाव ...


Naav...

 Naav..

कधी कधी काही घटना मनाला इतक्या अस्वस्थ करतात कि आपण स्वतःच काही गोष्टींवर कथानक लिहू लागतो , अशीच हि एक गोष्ट जो माझा अनुभव नाही पण कुणा जवळच्या व्यक्तीच्या अनुभवा वरून कागदावर उतरवली .आयुष्य पण अथांग सागरावर डौलणाऱ्या

नावे सारखंच तर असतं , जीचा जन्मचमुळी सागरासाठी  झालायं , पण सागराची म्हणून नाही . अशी हि नाव जिला सतत आपल्या ध्येयाची जाणीव असायची , त्यासाठीच ती प्रवास करायची तिला एका वाऱ्याच्या झोक्याने अशी हलवली कि ती त्या सागराच्या सहवासा साठी तडपू लागली , क्षणिक सुखासाठी स्वतःला बुडवून घेऊ इच्छित होती ,अविचारी  बनली होती पर्वा नव्हती तिला बुडण्याची ! 

सागरच आपलं सर्वस्व तिला वाटत होता , हे जरी खरं असलं कि सागरा शिवाय तिच्या  अस्तित्वाला किंमत नव्हती तरी ती फक्त सागरासाठीच थोडी बनली होती ? खरं तर तोच सागर तिचासाठी  न मिळणारी अशक्यप्राय गोष्ट होती ,तळमळत होती, विव्हळत होती . त्याला मिळवण्यासाठी ,पण नाही ते कधीच शक्य होणार नव्हतं ,कारण उसळणारा पाण्याचा प्रवाह आणि लाकडाची ती नाव एक होणे  अशक्य , ती कुठे हि गेली तरी वेगळी पडणार होती , पण वेडी होती ती , सागरच खुळ होत डोक्यात ,कसे समजावणार तिला ? 

खरे तर तिची हि अवस्था  न सागराला कळत  होती न  त्याचा लाटांना , त्यामुळे ती अधिकच दुखावल्या जात होती ,मनावर घाव होत होते .  तिची ही अवस्था  खरे तर नियतीलाही पाहवत नव्हती . पण नियतीही फक्त तिचा साठीच तर नव्हती ना ? नियतीलाही कुणाचा सुखासाठी कुणाला दुःख देना गरजेचं होत . नावेच्या  दुःखात सुख दडलं होत ते  नदीचं !

सागर आणि नदी जे नातं वर्षानुवर्षांच होत . मनाची अवस्था न कुणाला सांगता येत होती न  बोलून दाखवता येत होती . रोज सागरावर जायची , नवनवीन स्वानने रंगवायची ,सागराला कुणी दोष दिला तर वेदना तिला होत होत्या . त्याचासाठी सर्वांशी लढण्यातसही  ती तयार होती कारण जणून होती ती त्याच महत्व , कळत होता तिला त्याचा चांगुलपणा , सर्वांना स्वतः मध्ये सामावून घेण्याचा , आणि  तरीही शांत रहायचा , कारण त्याच्या मनात उठणाऱ्या लाटांची जाणीव होती तिला , तिला नेहमी वाटायचं आपण ज्या धाग्याने जोडले गेलोय तो अतूट आहे , पण ते भविष्यातही शक्य होणार नव्हतं ...

खरं  तर किनाराच तिच्या मनाच्या मानाच्या अवस्था शांत करू शकत होता . तिला डगमगताना वाचवू शकत होता .. पण सागर वेडी होती ती !  किनाऱ्याच महत्व तिला कधी  समजलंच  नाही, न ती समजून घेऊ इच्छित होती . वेड लागलं होत, ध्यास होता तो फक्त सागराचा , खरं  तर ती कधीच त्याचा अथांग रूपावर भाळली नव्हती . फक्त रूपावर भाळण्या इतकी ती उथळ  कधीच नव्हती .तिला त्याचाकडे खेचणाऱ्या  होत्या त्याच्या चांगुलपणाच्या लाटा . त्याचा तो उदात्तपणा. 


पण एक दिवस सागर  आणि नदीचा संगम तिला दिसला ,खचली ती ! कारण खळ्खळ्णारी नदी आणि उसळणारा  सागर जेव्हा  एक होतात . तेव्हा त्यांच्यात वेगळं अस्तित्वच उरात नाही ,ते केवळ पाणी म्हणून एक होतात , पण नाव ?? नाव कुठेही  गेली  तरी वेगळी पडणार होती . एकच जात होती नदी आणि सागराची , एक व्हायला त्यांना वेळच लागत नाही , हे उमगल्यावर बेभान झाली . मन  सुन्न  झालं , स्वप्नातले रंग तर केव्हाच उडून गेले  होते . ज्या सागरावर आपण रोज जातो तो आपला नाही, ज्याचे आपण स्वप्न रंगवतो तो आपला नाही , त्यावर आपला काहीच अधिकार नाही , हे समजून खूप रडली , तडफडली आणि अखेर ताडप सहन न होऊन नदीच्याच प्रवाहाने उध्वस्थ झाली , भंगली ती !


तुकडे तुकडे झाले तिचे , तरी न सागराला त्याच दुःख  होत न त्याच्या लाटांना , कारण तीच वेडच त्यांना कधी उमगलं नव्हतं . शेवटपर्यंत तुकडे तिचा मनाचे तरंगत राहिले सागरावर , याच आशेने  कि ते तरी कधी सागराचे होतील , पण नाही, लाटांनी त्यांना ही  किनाऱ्याच्या  स्वाधीन केले . 


वेडी होती  ती , मृत्यूनंतरही वेडीच राहिली !

But this is not the end.... Sequels ka jamana hai dosto , iska bhi ayega....




Comments

  1. Superbly written 👍 Loved it!!

    ReplyDelete
  2. Khup sunadar.... Khup diwsani ASA Marathi vachlay

    ReplyDelete
  3. Are waah.. sahii.. emotional kr diya yr tune to... Now waiting for sequel.. so jast wait karayla lau nkos..

    ReplyDelete
  4. Mast Amruta..👍 keep going 😊

    ReplyDelete
  5. Really awesome n heart touching... U r a awesome writer... Keep it up...����������

    ReplyDelete
  6. Are khup masta Amruta...finally kela mag publish tu..good job keep it up😊😄

    ReplyDelete
  7. खूप छान waiting for sequel

    ReplyDelete
  8. Hoo kela publish😊 thank you😍

    ReplyDelete
  9. Awesome. Keep it going higher.

    ReplyDelete
  10. Khoop chan G Rene...keep it up.... excited for part 2

    ReplyDelete
  11. छान मांडलस.... 👌👌

    ReplyDelete
  12. Mustch renu 👍

    ReplyDelete
  13. Really nice.... Heart Touching!!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Naav 2...

माझी देशभक्ती