जाळे मी 11 th ला असताना अनुभवलेला किस्सा म्हणावा तर खरा म्हणावा तर काल्पनिक, कधी कधी निवांत क्षणी जेव्हा निसर्गाला न्याहाळतो तेव्हा लक्षात येत कि माणूस आणि निसर्ग काही वेगळा नाही,त्यातही माणसाच्या मना सारख्या भावना असतात फक्त माणूस बोलून व्यक्त होतो आणि निसर्ग कृतीतून. .. एक होता वेडा पक्षी जो आपल्याच नादात रमायचा , सर्वात वेगळा सर्वात मोकळा .... रोज आकाशात दिवसभर मनसोक्त उडायचा,आनंदी राहायचा आणि दुसऱ्यालाही आनंदी ठेवायचा, जणु जगातला तो सर्वात आनंदी पक्षी आहे . नात्यांचे कुंपण त्याने स्वतः भोवती कधी घातलेच नाही. निळे आकाश त्याला साद द्यायचं आणि तो ही सर्व विसरून झेपावायचा ,जणु सारे दुःख आणि मरगळ तो त्या उंच आकाशात सोडून य...