सहज सुचले म्हणून...

                                             


                              जागी सर्वसुखी  असा  कोण आहे ?
                               विचारी मना  तुची  शोधूनि पाहे

       जगात खूप लोक  कुठल्या  ना  कुठल्या कारणाने  दुःखी  आहेत . पण  तरी हे जग  किती  सुंदर आणि  आनंदी आहे . प्रत्येकाला  त्याचा  वाटायचं दुःख मिळतं  पण  काळ  हेच त्या वर औषध असतं . असं  म्हणतात  देव दुःख त्यानंच  देतो , ज्यांच्यात ते पेलण्याची ताकद असते . पण खूप लोक दुःखाला कवटाळून बसतात आणि दुःखाचा डोंगरच उभा राहतो.मग असाह्य होतात वेदना! खरं तर हे खरे की दुःख विसरणे महाकठीण काम आहे.ते ही सुखाच्या नंतर मिळणारं दुःख, सुख स्वप्नांना क्षणात भंग करणारे दुःख ! खरे पाहता सुखच दुःखाच खरं कारण असत असं मला वाटतं.कारण दुःखात माणसाला आठवतात ते फक्त सुखाचे दिवस.देवाने कदाचित सुख दुःखाचा एका मागे एक असा क्रम लावला असेल. जो नेहमी पार करत  आपण आपले आयुष्य जगत असतो. आयुष्याचा अंताला सुख आणि दुःख दोघेंही आपल्याला हातावर आयुष्याची सुंदर गुंफण ठेवत असतील. सुख गोड स्वप्ननांची आणि अनुभवलेल्या सुखी घटनांची,जाणिवांची अनमोल भेट देते तर दुःख केलेल्या चुकांची आणि त्यातून सावरलेल्या मनाची जणु विजयश्रीच सांगत असते.आणि या मुळेच जीवनाचा अंताला तयार होत असेल तो खरा माणुस..! पण तो जीवनाचा अंत असतो....

Comments

Popular posts from this blog

Naav 2...

माझी देशभक्ती

नाव ...