Jale

             जाळे  
  

      मी 11 th ला असताना अनुभवलेला किस्सा म्हणावा तर खरा म्हणावा तर काल्पनिक, कधी कधी निवांत क्षणी जेव्हा निसर्गाला न्याहाळतो तेव्हा लक्षात येत कि माणूस आणि निसर्ग काही वेगळा नाही,त्यातही माणसाच्या मना सारख्या भावना असतात फक्त माणूस बोलून व्यक्त होतो आणि निसर्ग कृतीतून...

                          एक होता वेडा पक्षी  जो  आपल्याच  नादात  रमायचा , सर्वात  वेगळा  सर्वात  मोकळा .... रोज आकाशात  दिवसभर  मनसोक्त  उडायचा,आनंदी राहायचा आणि दुसऱ्यालाही  आनंदी ठेवायचा, जणु  जगातला तो सर्वात आनंदी  पक्षी आहे . नात्यांचे  कुंपण  त्याने स्वतः  भोवती  कधी घातलेच नाही.  निळे आकाश  त्याला साद  द्यायचं आणि तो ही सर्व विसरून झेपावायचा ,जणु सारे दुःख आणि मरगळ  तो त्या उंच  आकाशात  सोडून  येतो असा वाटतं तो कधी एकटा उदास  बसत नव्हता.
एकांतातही  त्याला  आनंदी व्हायला कारण शोधावं  लागत नव्हतं . इतरांनाही  त्रासात त्याला  बघवत  नव्हतं . 
                        जणु  दुःख  त्याचा  समोर कधी येतच नव्हते ,दुःख काय असत हे त्याला  माहीतच  नसावं . कारण त्याचा आनंद  त्याचा स्वतः  मध्ये  दडलेला  होता , एकदा स्वैर  उडणारा तो पक्षी  झाडावर बसलेला  होता ,एका  पारध्यांची  नजर  त्यावर  पडली ,तो पारधी काही दुष्ट  नव्हता ,तो रोज तिथे यायचा त्याचं काम करायचा आणि   पक्षाकडे  ही खूप कौतुकाने  पाहायचा , पक्षाने  विचार केला  हा पारधी असून याने मला कधीच  त्रास दिला नाही ,उलट प्रेमाने  दोन  दाणे  टाकले . पारध्याच्या  मनात  काय होत  देव  जाणे , पण पक्षाला  त्याचा लळा लागला .  तो रोज तिथे  यायचा  पक्षाला  वाटले याला  आपल्या सोबत  मैत्री  करावी  वाटत असेल . 
हा कदाचित  आपल्याला त्याचा घरी नेऊ इच्छित असेल , पारध्यानेही तसेच केले ,त्याने जंगलात  ठिकठिकाणी  जाळे  पसरवले होते ,तसेच इथेही टाकले . पण  वेद होता पक्षी त्याला ते कधी जाळे वाटलेच  नाही . तो स्वतः  होऊन त्या जाळ्यात फसला . त्याच  ते स्वछंद  बागडणं सोडून ,त्या जाळ्यात  अडकणं  त्याला जास्त आवडू लागलं . तो कसेबसे  झाडावरचे फळं  खाऊन जागू लागला त्यातही त्याला  आनंद वाटू लागला . पण पारधी  परत  आलाच नाही . न  जाळे काढायला  न  पक्षाला  बघायला .... पक्षाने खूप दिवस त्याची वाट  बघितली  पण  तो ना त्याला  न्यायला आला ना  सोडवायला ..... 
                       नंतर  इतर  पक्षांच्या  मदतीने तो सुटला ,पण  सारे जंगल  जणू विराण झाले  होते . सतत चिवचिवणारा  तो खग  वाचा  गेल्यागत  शांत  झाला . त्याचं ते किलबिलनं  हसणं  जणु  कालबाह्य  झालं  होत . बहिरा  झाला  होता  तो  उंच  आकाशाने  दिलेली साद , निसर्गाचा  नाद , त्याला  काही काही  ऐकु  येत नव्हतं . कधी आकाशात  फेरी मारली तरी त्याची  नजर सतत  पारध्याला  शोधायची ,पण सर्व  निरर्थक  होत , सतत  कोमेजुन  घरट्यात बसुन  राहायचा . 
करणार  तरी काय? नातंच  असा  विचित्र  होत . पक्षाने  कधी  पारध्याच्या  प्रेमात  पाडाव का ? शेवटी तो  पारधी , सर्व असताना  त्याला  पक्षाची काय गरज ?
पक्षाला  विसरणे  साहजिक  होते .  पक्षाच्या  नजरेची  चुक होती . भर  उन्हात  पक्षाला  शोधात  हिंडायचा , त्या  नंतर ना पारधी परतला  ना  पक्षाने  परत  गाणी  गायली ... आयुष्य  कसं  निघून  गेलं कळलंच  नाही .....
                         
                  माणसातही  असतात  असे  सुप्त  पक्षी,ज्यांच्या  भावनांना  कधी  वातच  मिळालेली  नसते ,सततची  होणारी  घुसमट  त्यांचा  आयुष्यातले  रंगच  उडवुन  टाकते . 
कधी  काळी  मनसोक्त  आयुष्याची  मजा घेणारा  माणुस  कसे बसे  आयुष्याचे  दिवस  काढतो .न काही  मिळाल्याचा  आनंद त्याला  होतो  न गमावल्याचं  दुःख  जाणवतं .... 



                              











Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Naav 2...

माझी देशभक्ती

नाव ...