Naav 2...





Naav...2

                      भंगलेल्या त्या नावेला नावाड्याने पुन्हा  जन्म दिला , जगण्याचा नवा उद्देशहि त्याने  तिला समजावून सांगितला , त्याने समजावले कि " तू अशी नव्हतीसच कधी,अशा कित्तेक सागरातून आणि सरोवरातून तू प्रवास केलास ,पण ते तुला भुरळ घालु शकले नाहीत , कारण ते तुझे खंबीर आणि उदात्त विचार , महान  आदर्श ! , संकटांकडे तू नेहमी एक खेळ म्हणूनच बघत आलीस , कधीच अशा गोष्टीत गुरफटली नाहीस , परंतु वय , होय ते वयच तुझा तोल जायला करणी भूत ठरलं . आता विसर ते सर्व आणि  नव्याने ध्येय बनव . "
"सागराला ध्येय नाही तर ध्येय कडे जाण्याचा मार्ग बनव !"
                      तुझी स्वप्न वेगळी आहेत अशा मृगजळाचा मागे धावून स्वतःचा मार्ग चुकवू नकोस... हे सर्व समजून सावरली ती , सर्व मागे टाकून पुढे जाण्याचा निश्चय करून ,आता कुठे सावरली होती . 

                         आधी  सागरच नाव घेताच उंच भरारी घेणार तीच मन , आता फक्त तिची नजर जमिनीवर आणून ठेवत होत.  चेहऱ्या वरच ते सुंदर हास्य कधीच मावळलं होत . तिचा चेहेऱ्यावर एक हसू उमटत होत ते हि "उपहासित " ! ,कारण तीच सागरच वेडच सर्वांचा हसण्याचं कारण बनलं होत . सागराला समोर असताना त्याला विसरणे तिला कसे होतें ? निश्चयहि पक्का होता कारण जीवनाच्या सारीपाटावर तिला मिळालेला तो सर्वांत मोठा शह होता , पण  तिने तो पेलला  होता , अगदी शर्तीने !
                           आणि आता हा डाव जिंकण्याची तिची इच्छा होती. पण खरंच का ती ते सर्व विसरू शकत होती? सागरच ते खळखळणार हास्य , त्याच्या साठी ते तीच झुरणं ,तो तिला होणार मनमुराद आनंद....  ती कधीच विसरू शकत नव्हती . 

                             नियतीहि या कठोर परीक्षेनंतर तिला काय दाखवू इच्छित होती देव जाणे . त्याच्या विषयीच अथांग प्रेम मनातून कधीच गेलं नाही , वरून सागराला कुणी काही बोलताना यातना तिला मनात होत होत्या .पण जितकी प्रेमळ तितकीच जिद्दी होती ती ,आता  तीच हे नवं  रूप पाहून सागरा सहित किनारा आणि वाराही  भारावला होता ,सागराला तेव्हा वाटलं कि नाव  आपलीच आहे , पण या गोष्टीची त्याला जाणीव पण नव्हती कि तिच्या भंगण्याच कारणहि तो स्वतःच होता ! आता तिला बघण्यात काय अर्थ होता ? तीच मन जरी अजून सागरा जवळ घुटमळत होत . तरी  त्याचा पासूनच दूर जाण्यात तीच हित  होत . 

                एक मात्र खरं  होत ,नियतीचा हा खेळ आणि  सागरच वेड या तिचा आयुष्यातल्या अविस्मरणीय गोष्टी होत्या , आता कुठल्याच गोष्टीची ओढ  किंवा आनंद तिला जाणवत नव्हता , प्रत्येक आनंदाच्या क्षणी तिचा डोळ्यांत अश्रु दाटत होते.  सिद्ध केले होते कि आपण फक्त तिचा रथाचे घेडे आहोत ज्यांचा लगाम तिच्या हाती असतो , म्हणूनती हवे तशी हव्या त्या पद्धतीने ते पाताळात असते , पण माणसाने ठरवले तर तो कुठल्याही परिस्थितीतुन परत उभा  राहू शकतो आणि नवे ध्येय  गाठू शकतो.  


पण शेवटी एकदा  तुटलेली वस्तू असो वा  मन परत जशाला तसे जोडता  येत नाही , आणि जरी जोडली तरी त्या वर तुटल्याच्या तडा गेल्याच्या खुणा  तशाच असतात  त्या त्याला परत पूर्वी प्रमाणे  अभंग बनवू शकत नाहीत ..... 

so gys end is not where you break ,but where you stop...❤













Comments

  1. I was really waiting for this..mast������

    ReplyDelete
  2. खरच खूप मस्त, या जगात प्रत्येक जण त्या नावे सारखाच!!! आपण पण एखाद्या गोष्टीला मिळवण्या साठी जीव तोडून प्रयत्न करतो पण जेव्हा कळत की आपला हट्ट च चुकीचा आहे तेव्हा खरच कोणत्याच गोष्टी ची ओढ किंवा आनंद जाणवत च नाही.

    ReplyDelete
  3. खर आहे yarrr 👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

माझी देशभक्ती

नाव ...