Posts

Naav 2...

Image
Naav...2                       भंगलेल्या त्या नावेला नावाड्याने पुन्हा  जन्म दिला , जगण्याचा नवा उद्देशहि त्याने  तिला समजावून सांगितला , त्याने समजावले कि " तू अशी नव्हतीसच कधी,अशा कित्तेक सागरातून आणि सरोवरातून तू प्रवास केलास ,पण ते तुला भुरळ घालु शकले नाहीत , कारण ते तुझे खंबीर आणि उदात्त विचार , महान  आदर्श ! , संकटांकडे तू नेहमी एक खेळ म्हणूनच बघत आलीस , कधीच अशा गोष्टीत गुरफटली नाहीस , परंतु वय , होय ते वयच तुझा तोल जायला करणी भूत ठरलं . आता विसर ते सर्व आणि  नव्याने ध्येय बनव . " "सागराला ध्येय नाही तर ध्येय कडे जाण्याचा मार्ग बनव !"                       तुझी स्वप्न वेगळी आहेत अशा मृगजळाचा मागे धावून स्वतःचा मार्ग चुकवू नकोस... हे सर्व समजून सावरली ती , सर्व मागे टाकून पुढे जाण्याचा निश्चय करून ,आता कुठे सावरली होती .                           आधी  सागरच नाव घेताच उंच भरारी घेणार तीच मन , आता फक्त तिची नजर जमिनीवर आणून ठेवत होत.  चेहऱ्या वरच ते सुंदर हास्य कधीच मावळलं होत . तिचा चेहेऱ्यावर एक हसू उमटत होत ते हि "उपहासित " ! ,कारण तीच सागरच वेडच सर

नाव ...

Image
 Naav.. कधी कधी काही घटना मनाला इतक्या अस्वस्थ करतात कि आपण स्वतःच काही गोष्टींवर कथानक लिहू लागतो , अशीच हि एक गोष्ट जो माझा अनुभव नाही पण कुणा जवळच्या व्यक्तीच्या अनुभवा वरून कागदावर उतरवली .आयुष्य पण अथांग सागरावर डौलणाऱ्या नावे   सारखंच तर असतं , जीचा जन्मचमुळी सागरासाठी  झालायं , पण सागराची म्हणून नाही . अशी हि नाव जिला सतत आपल्या ध्येयाची जाणीव असायची , त्यासाठीच ती प्रवास करायची तिला एका वाऱ्याच्या झोक्याने अशी हलवली कि ती त्या सागराच्या सहवासा साठी तडपू लागली , क्षणिक सुखासाठी स्वतःला बुडवून घेऊ इच्छित होती ,अविचारी  बनली होती पर्वा नव्हती तिला बुडण्याची !   सागरच आपलं सर्वस्व तिला वाटत होता , हे   जरी खरं असलं कि सागरा शिवाय तिच्या  अस्तित्वाला किंमत नव्हती तरी ती फक्त सागरासाठीच थोडी बनली होती ? खरं तर तोच सागर तिचासाठी  न मिळणारी अशक्यप्राय गोष्ट होती ,तळमळत होती, विव्हळत होती . त्याला मिळवण्यासाठी ,पण नाही ते कधीच शक्य होणार नव्हतं ,कारण उसळणारा पाण्याचा प्रवाह आणि लाकडाची ती नाव एक होणे  अशक्य , ती कुठे हि गेली तरी वेगळी पडणार होती , पण वेडी होत

जिंदगी

                                                                         वो जिंदगी ही क्या, जो दिल से अरमान छीनले ,                                        वो जीना ही क्या,जो चेहरेसे  मुस्कान छिनले ,                                        इससे अच्छी  तो वो मौत है  जनाब ,                                      जो कुछ पल रुलाये और सारी  तकलीफे  छिनले।  ☺☺

माझी देशभक्ती

Image
                 26 जानेवारी भारताच्या इतिहासातला एक महत्वाचा दिवस ,उद्या सर्वत्र झेंडा वंदन होईल,देशभक्तीची गीते गायली जातील,इतकेच काय तर चित्रपटही सर्व देश भक्तीचेच,छोटी छोटी मुले आपल्या स्वच्छ आणि निरागस हृदयात देशाची मोठी प्रतिमा तयार करतील,सर्वत्र झेंडे घेऊन फिरणारे लोक,काही विकणारे तर काही खरेदी करणारे,सर्व देशभक्ती मध्ये रंगलेले  ,नेहमी प्रमाणे देशाशी देणं घेणं नासर्यांनाही देशप्रेम सुचेल,आज हातात झेंडा असेल आणि उद्या? उद्या काय?      उद्याचा दिवसाचं काही वेगळा, तोच झेंडा उद्या घराच्या कोपऱ्यात केविलवाणा पडलेला असेल.का ही अवस्था झाली आमची? देश प्रेमाचंही प्रदर्शन? तेही एका दिवसा पुरत मर्यादित,रोज कुणाला वेळ भेटतो म्हणा देशाचा विचार करायला,पण या दिवशी तरी करा, 31 ला जसा गेल्या वर्षाचा चुका मोजतो,तसंच मी मागील 26 जानेवारी ते आज पर्यंत किती देशाचा विचार केला?कधी विचारलय मनाला ? भारत ज्यासाठी असंख्य लोकांनी हुतात्म्य पत्करले,आणि हो जाती धर्म सोडून फक्त देशासाठी लढले,पण इतकं करून मिळवलं काय? न त्यांचे आत्मे तृप्त न आमचे! सांगायला आम्ही आमचा इतिहास खूप मोठा सांगतो,पण त्यातून आ

What Indian youth wants

Image
                                              frankly speaking i just don't want to discuss the annoying issue happening in Maharashtra. Because if i say some thing then some people will Show a finger to my cast, But during this i realise some things which i think most of us have felt and faced during last two days. and only that thing provokes me to write something.         friends  Don't you think that we have no reason to think about why this happened and who did it, and it did not have any use,but the state shakes and burned.Our country is the biggest youth power,but some peoples are trying to swivel them in wrong way.i think its can be political game and and people like us have to stay away from it.At such a sensitivity, we have to focus on reducing things rather than increasing it.Nowadays, people do not even think about themselves, due to this the destruction of such destructive people.               We need to remember that we are Indians first,our religion
Image
Hello all... Wish you and your family a very happy Christmas, may god bless you all , with pure and longlasting happiness. have happy,prosperous, healthy year ahead... Happy christmas to all...

सहज सुचले म्हणून...

                                                                            जागी सर्वसुखी  असा  कोण आहे ?                                विचारी मना  तुची  शोधूनि पाहे        जगात खूप लोक  कुठल्या  ना  कुठल्या कारणाने  दुःखी  आहेत . पण  तरी हे जग  किती  सुंदर आणि  आनंदी आहे . प्रत्येकाला  त्याचा  वाटायचं दुःख मिळतं  पण  काळ  हेच त्या वर औषध असतं . असं  म्हणतात  देव दुःख त्यानंच  देतो , ज्यांच्यात ते पेलण्याची ताकद असते . पण खूप लोक दुःखाला कवटाळून बसतात आणि दुःखाचा डोंगरच उभा राहतो.मग असाह्य होतात वेदना! खरं तर हे खरे की दुःख विसरणे महाकठीण काम आहे.ते ही सुखाच्या नंतर मिळणारं दुःख, सुख स्वप्नांना क्षणात भंग करणारे दुःख ! खरे पाहता सुखच दुःखाच खरं कारण असत असं मला वाटतं.कारण दुःखात माणसाला आठवतात ते फक्त सुखाचे दिवस.देवाने कदाचित सुख दुःखाचा एका मागे एक असा क्रम लावला असेल. जो नेहमी पार करत  आपण आपले आयुष्य जगत असतो. आयुष्याचा अंताला सुख आणि दुःख दोघेंही आपल्याला हातावर आयुष्याची सुंदर गुंफण ठेवत असतील. सुख गोड स्वप्ननांची आणि अनुभवलेल्या सुखी घटनांची,जाणिवांची अनमोल भेट देते तर