माझी देशभक्ती


                26 जानेवारी भारताच्या इतिहासातला एक महत्वाचा दिवस ,उद्या सर्वत्र झेंडा वंदन होईल,देशभक्तीची गीते गायली जातील,इतकेच काय तर चित्रपटही सर्व देश भक्तीचेच,छोटी छोटी मुले आपल्या स्वच्छ आणि निरागस हृदयात देशाची मोठी प्रतिमा तयार करतील,सर्वत्र झेंडे घेऊन फिरणारे लोक,काही विकणारे तर काही खरेदी करणारे,सर्व देशभक्ती मध्ये रंगलेले  ,नेहमी प्रमाणे देशाशी देणं घेणं नासर्यांनाही देशप्रेम सुचेल,आज हातात झेंडा असेल आणि उद्या? उद्या काय? 
    उद्याचा दिवसाचं काही वेगळा, तोच झेंडा उद्या घराच्या कोपऱ्यात केविलवाणा पडलेला असेल.का ही अवस्था झाली आमची? देश प्रेमाचंही प्रदर्शन? तेही एका दिवसा पुरत मर्यादित,रोज कुणाला वेळ भेटतो म्हणा देशाचा विचार करायला,पण या दिवशी तरी करा, 31 ला जसा गेल्या वर्षाचा चुका मोजतो,तसंच मी मागील 26 जानेवारी ते आज पर्यंत किती देशाचा विचार केला?कधी विचारलय मनाला ? भारत ज्यासाठी असंख्य लोकांनी हुतात्म्य पत्करले,आणि हो जाती धर्म सोडून फक्त देशासाठी लढले,पण इतकं करून मिळवलं काय? न त्यांचे आत्मे तृप्त न आमचे!
सांगायला आम्ही आमचा इतिहास खूप मोठा सांगतो,पण त्यातून आम्ही शिकलो काय ? प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा आपण जाती धर्माच्या नावावर विभागलो गेलो तेव्हा फक्त पतन झालाय, पण आम्ही इतिहास फक्त राजकरणा साठी वाचतो,तो हि खरा काय खोटा काय हे आम्हाला नकोय, हवाय फक्त स्वतःचा त्यातून होणारा फायदा, कारण असे नसते तर आमचे स्वतंत्र सैनिक जातीधर्मा मध्ये विभागले गेले नसते.अखंड भारता साठी लढलेले ते सेनानी आता जाती जाती मध्ये अडकवले गेले,कुणी दिला हा अधिकार ? ज्यांचे विचार आपण अमलात आणू शकत नाही त्यांची नावे वापरून राजकारण करण्याचा काय अधिकार आपल्याला? हा त्यांचा सर्वात मोठा पराभव आहे हे कधी समजणार आपल्याला,ज्या देशाचा गणतंत्र दिवस आपण साजरा करतोय त्या देशाला आपल्याच पासून जास्त धोका आहे, कारण आम्ही आमच्याच प्रेरणा स्रोतांना वाटून घेतलंय.कुणी सर्व जगातल्या पीडितांना शिक्षणाच्या मार्गावर आनणाऱ्या आंबेडकरांना ,फक्त बौद्धांच बनवलं? जाती निर्मूलनाच काम करणाऱ्या सावरकारांना  कुणी फक्त ब्रह्मण म्हणून हिनवल??  कुणी 18 पगड जातींना एक स्वराज्याच स्वप्न दाखवणऱ्या छत्रपतीला फक्त मराठ्यां पुरत खुज करून ठेवलं ? हि आणि इतर अनेक महात्मे जातीच्या  चौकटीत मावत नाही हे कुणी सांगावं माझ्या भारताला?  आणि हे सर्व कशासाठी? घाणेरड्या राजकारणा साठी?? यात नुकसान केवळ आणि केवळ आपलं आहे,बाहेरील आतंकवादी आपल्या जाती बघून आपल्यावर हल्ला करत नाहीत,ज्या देशाला स्वतंत्रसैनिकांनी रक्ताने उभारलं आणि सीमेवरचे  जवान रक्ताचं पाणी करून जपताय त्या देशाला आपल्या वर्तनाने आतून पोकळ करून सोडतोय,आणि हि खुप काळजीची गोष्ट आहे, हे आज नाही जाणवलं नाही तर नंतर पश्यातापला अर्थ राहणार नाही.आज राष्ट्रगीताला उभं राहावं की नाही यावर जर आपण वाद घालत असू तर आपली देशभक्ती कुठल्या थराला जातेय हे आपण बघायला हवं  जग पुढे जातंय आणि आपण पण एक होऊन पुढे जाण्यातच सर्वांची प्रगती आहे ,संस्कृती बदलत असते तसं आपण पण बदलावं.आणि आधीच्या संस्कृतीचा सन्मान करावा, आणि पुढे चालावं, झालेल्या इतिहासाचा सन्मान करून पुढे इतिहास राचावा.या गणतंत्र दिवसा पासून जरी आपण यातून बाहेर येण्याची शपथ घेतली तरी ही शाहिदांना खरी श्रद्धांजली असेल असा मला वाटत.आणि उद्या झेंडा हातात नाही घेतला तरी चालेल पण देशाला आपल्या कृतीतून सक्षम बनवूया....
                    गणतंत्र दिवस चिरायू होवो

            Happy Republic Day to all

Comments

Popular posts from this blog

Naav 2...

नाव ...