Open letter to godess Padmavati
Open Letter To PADMAVATI
देवी पद्मावती,
आदर पूर्ण नमन,
खूप दिवसां पासून आमच्या देशात इतिहासा वरून वाद होत आलेत,आणि अजूनही सुरुच आहेत, आणि या वादात नेहमी महान युगपुरुषांचा अपमानच होत आला,आज त्या यादी मध्ये तुम्ही उभ्या आहात, खूप वाईट वाटत ,पण नेहमी प्रमाणे बोलण्या व्यतिरीक्त मी काहीच नाही करू शकत, राजपूत समाज तुम्हांला देवी मानतो, का नाही मानणार त्यागाची परिसीमा गाठलीत तुम्ही...पण खरे पाहता आमच्या देशात काहीच किंमत नाही हो या त्यागाची, कारण तुमचा अपमान होऊ नये म्हणारे पण त्यांचा वर्तनातून तुमचा अपमानच करताय आणि जे स्वतःचा स्वार्थासाठी तुमच्या नावाचा वापर करताय त्यांना आमच्या कायद्याचं आणि धर्मनिरपेक्षतेच संरक्षण मिळालाय, यात तुम्ही सांगा तुमच्या त्यागाचा मान कोण ठेवतय??
केवळ मनोरंजन म्हणुन मूवी बघा म्हणार्यांना तर दूर दूर पर्यंत तुमची आठवण पण नाही. खूप दिवसांपासून बातम्या बघतेय खूप मोठे प्रकांड पंडित येतात चर्चा करायला वाहिनीवर आणि एकमेकांवर चिखलफेक करून मोकळे होतात.तुमचा बालिदानाला नमन करण्याची बुद्धी कुणाला होत नाही, काही काही महिला ज्यांना हे कळत कि स्री ची गरीमा तिचा मान तिचासाठी सर्वस्व असतो, अशा महिला जेव्हा तुमचा बालिदानावर म्हणतात कि "पद्मावती काही लढता लढता नाही गेली,खीलजिला घाबरून जोहर केला" तेंव्हा संताप होतो, कोण कुठल्या या बायका आणि आता या जोहरची व्याख्या सांगणार...?ज्यांना स्त्रीच्या शीलाच महत्व कळत नाही या बोलणार सती वर ?? आणि हे असले लोकं पुढच्या पिढीला इतिहास शिकवणार..? तुमच्या त्यागाची 1% जरी जाणीव या लोकांना असली असती तर भारतात त्याच्याच इतिहासाची होळी झाली नसती, ते ही त्याचेच कायदे आणि त्याचीच अभिव्यक्ती स्वातंत्र्य वापरून, तेव्हा जास्त दुःख होत. आणि आता तर खुप बुद्धिजीवी म्हणवणारे लोक म्हणतात की पद्मावती कवीची कल्पना आहे,सत्य इतिहास नाही,सरळ तुमचा अस्तित्वावर प्रश्न करतात.पण मला वाटत इतिहास ज्याला अनुभवता येतो तो कधीच असं नाही बोलणार,आणि मान्य केलं की तुम्ही कवीची कल्पना आहात. पण इतकी श्रेष्ट कल्पना असेल तर त्या कल्पने समोर नतमस्तक होण्यात मला अभिमानच वाटेल.कारण बलिदान कुठल्या जरी रूपात असेल ते वंदनीय आहे.
पण आमच्या देशात इतिहास फक्त राजकारना साठी वाचला जातो. हे किती दिवस चालणार?
राजकारणापायी पैस्या पायी इतिहास किती वेळा बदलणार? बाहेरील देशात 300 लोकांची साधि लढाई झाली,तिला त्यांनी किती मोठ्या स्वरूपात दाखवली, गर्वाने आपण पण "300" बघतो.आणि आपला इतिहास? जो खरच सुवर्णमय आहे त्याची अशी हेळसांड करतो. आज तुमची माफी मागावी वाटतेय आमची ऐपत नाहीये तुमचे वंशज म्हणवायची. तुम्ही स्वतः अग्नी प्रवेश केला आणि खिलजीच्या विजयला त्याचा पराजयात परिवर्तित केलंत.पण आम्ही त्या पराजयला त्याचा विजय दाखवतोय,मग तुमच्या बलिदानाला काय तो अर्थ राहिला...तुम्हीच काय आम्ही आमच्या सर्व हुतात्म्यांच बलीदान व्यर्थच घालावतोय.आणि त्याची जाणीव पण नाही हो आम्हाला.पण हे नक्की की एकदिवस असा येईल जो या असंवेदनपणाचा, या अति अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पश्याताप कारवेल.तोवर इतकीच अपेक्षा कि आमच्यावर तो दिवस न येवो.आणि हे हि इतकंच खरं कि काजव्यांची चमक सूर्योदया पूर्वीच टिकते, सूर्योदय झाला की त्यांचा निरर्थक किरकिरीला काहीच अर्थ राहत नाही . तसेच हुतात्म्यांचे तेज असल्या लोकांच्या बडबडीने किंवा २-३ तासांचा चित्रपटामुळे झाकाळू शकत नाही . शेवटी इतकंच की तुमच्या बलिदानाला आम्ही कधी व्यर्थ नाही जाऊ देणार , जोवर त्याची गरिमा राखता येईल आम्ही राखु,तुमचं बलिदान सर्व स्त्रियांसाठी नेहमी प्रेरणा ठरेल . त्या साठी देव आम्हाला शक्ती आणि बुद्धी देवो .

Bharich re amre
ReplyDeleteवा मस्तच ना...
ReplyDeleteखुप भारी 👌👌👌👌
Mast 👌👌
ReplyDeleteNice 👌👌
ReplyDeleteखूप छान अमृता
ReplyDeletety so much all
ReplyDelete