The storm around Padmavati
The storm around Padmavati
पद्मावती चित्रपट अनेक कारणांमुळे
वादग्रस्त
बनलाय कारण फक्त ऐतिहासिक चित्रपट आहे
म्हणून नाही , तर त्याचे पण अनेक मुद्दे आहेत. प्रथम हे सर्व हेतुपुरस्सर प्रसिद्धीसाठी
केले जाऊ शकते कारण दिग्दर्शकाने चित्रपटावर खूप गुंतवणूक केली आहे , आणि आमच्या देशात प्रसिद्धीचे स्टंट बरेच
कॉमन आहेत. आपण हे जरी मान्य केले की प्रत्यक्षात सर्व काही घडत असेल तर आपण यास
दोन दृष्टिकोनातून घेऊ शकतो.
एक
दिग्दर्शकाचा दृष्टिकोन आणि एक समाजाचा दृष्टिकोन.
जर आपण म्हणालो की
श्री. भन्सालींनी रानी पाद्मावती यांना श्रद्धांजली म्हणून चित्रपट बनवला, तर ते योग्य होईल आम्हाला त्यांच्या प्रयत्नांची
प्रशंसा करावी लागेल, आणि कलाकारांची
देखील कारण ते पात्राना जिवंत पणा
देतात. पण ते जर विचार करत असतील
की राणीची स्टोरी दाखवली तर मूवी प्रॉफिट देईल तर हे चुकीच ठरेल, कारण भारत एक विशिष्ट संस्कृती पाळतो त्यात
इतिहासाला खूप मोठं स्थान आहे आणि कुणी जर स्वतःच्या फायद्यासाठी इतिहासाशी खेळात असेल तर ते भारतात
कधीच मान्य होणार नाही.आणि होऊ हि नये ... राजपुती सेनेने याला विरोध केला कारण ते राणी
पद्मावतीला देवी मानतात आणि का नाही मानु तिने ते देवत्व तिच्या त्यागातून मिळवलाय. जर त्याचा कुणी अनादर करत असेल तर ते राजपूतच काय पण कुणालाच मान्य नसावं असं मला वाटत.
आणि या आधि त्यांनी "बाजीराव मस्तानी " मूवी मध्ये हि खूप गोष्टी आक्षेपार्ह दाखवल्या खरं तर विरोध तेव्हाही व्हायला
हवा होता पण तो झाला नाही . खरेतर ऐतिहासिक चित्रपट बनवताना जी खबरदारी घ्यायला हवी
ती दूर्दैवानें आपल्याकडे घेतली जात नाही. आणि
मला वाटत की दिग्दर्शक म्हणून भन्सालींनी या सर्व गोष्टींचा विचार करायला हवा होता
. आणि हे हि खरे कि चित्रपट पाहण्याआधी आपण त्याला दूषण लावू नये ,पण त्यातही हि असा
एक मुद्दा महत्वाचा कि जर त्यात आक्षेपार्ह काही असेल तर एकदा चित्रपट बाहेर पडला तर
बदलणे शक्य नाही . आणि या सर्व प्रकारावर अभिनेत्यांनी लोकांचे प्रतिनिधी बनून तिढा
सोडवायला हवा न कि भडक विधाने करून आग वाढवावी. आपल्या देशात राजामौली सारखे दिग्दर्शक
आहेत जे स्वतःच नवीन साम्राज्य बनवतात आणि तसे मूवी सर्वात जास्त चालूं पण दाखवतात न कि इतिहासाला तोडायचा प्रयत्न करतात . जर तुम्हाला
इतिहास दाखवायचा आहे तर तो जसा आहे तास दाखवा अन्यथा त्याची विटंबना करण्याचा अधिकार
आपल्याला नाही .
राहिला प्रश्न महाराणी पद्मावतीचा तर त्यांचा
बलिदानाला आपण काय दाखवणार ?? त्या स्वतःच एक दीपस्तंभ आहेत . शेवटी इतकंच की देशात
असल्या गोष्टींमुळे वाद होऊ नये .चित्रपट
प्रभोदनाचं एक माध्यम आहे ते तसंच राहावं .कुणी त्याचा गैरवापर करू नये कारण आधीच देशात
इतिहास वाचणाऱ्यांची संख्या कमी होतेय. एकदा
काई वेगळं दाखवल्या गेल तर कुणी त्याची शहनिशा करत नाही बसणार . उलट चिकीचा इतिहास
लोकांपर्यंत पोहोचेल आणि ते जस्त हानिकारक ठरेल. त्यामुळे आपण सर्वानी याच भान ठेवणं गरजेचं आहे….
Hope History will Not Misinterpreted by this Movie.
खूप छान .....
ReplyDeleteAwesome !!
ReplyDeleteTrue
ReplyDeleteEffective analysis Amruta.
ReplyDelete